मंत्रिपदाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनाही मंत्रीपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचं म्हटलं आहे. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या असं सांगत या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
नवनिर्वाचित सर्व मंत्र्यांचे अभिनंदन करून सर्वांना पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होते, प्रीतम मुंडे या विक्रमी मतांनी निवडून आल्या, असंही त्या म्हणाल्या.
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावुक झाल्या. गोपीनाथ मुंडे निवडून आले त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे. प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
भाजपाचे नेते डॉ. भागवत कराड हे राज्य मंत्री झाले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय?, असा सवाल उपस्थित करत सामनाच्या अग्रलेखातूनही मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी तो लेख वाचला नाही. लेख वाचल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया देईन. संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत. त्यांनी माझ्याशी बोलून ते लिहिलं नाही.
हेही वाचा -