Advertisement

राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून चौकशी

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांना काही अटींसह सभेला परवानगी दिली होती.

राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून चौकशी
SHARES

महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली यावेळी मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ तारखेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तर रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या या रॅलीला स्थानिक पोलिसांनी काही अटींसह मंजुरी दिली होती. मात्र, ही सभा संपल्यानंतर औरंगाबाद पोलिस आता राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करणार असून पोलिसांनी दिलेल्या अटींपैकी कोणतीही अट मोडल्यास पोलिस कारवाई करू शकतात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला. त्यानंतर आता पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. ३ तारखेपर्यंत मशिदींवरून भोंगे हटवले नाहीत तर ४ तारखेपासून अजिबात कुणाचं ऐकणार नाही आणि मशिदींसमोर दुहेरी आवाजात हनुमान चालीसाचं पठन करण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सभेत बजावलं.

अटी काय होत्या?

  • 1 मे रोजी दुपारी 4.30 ते 9.45 या वेळेत जाहीर सभा होणार.
  • स्थळ आणि वेळ बदलणार नाही.
  • सभेदरम्यान किंवा नंतर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह घोषणाबाजी, दंगा किंवा गैरवर्तन करू नये.
  • कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वाहनांना पोलिसांनी निश्चित केलेल्या रस्त्यांचे पालन करावे लागेल आणि लेन बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • या वाहनांना शहरात प्रवेश करताना विहित वेगमर्यादा पाळावी लागणार आहे.
  • जास्तीत जास्त 15,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकतात.
  • अधिक लोकांना आमंत्रित केल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीला आयोजक जबाबदार असतील.
  • कार्यक्रमादरम्यान शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन होता कामा नये.
  • कार्यक्रमादरम्यान कोणतीही शस्त्रे, तलवारी, स्फोटके दाखवू नयेत.
  • कोणत्याही व्यक्तीचा किंवा समाजाचा अपमान करू नका.
  • लाऊडस्पीकरच्या वापरामुळे वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन होता कामा नये.

मात्र, आता पोलीस राज ठाकरेंच्या भाषणाची चौकशी करून यातील काही अटींचा भंग झाला आहे का, याचा शोध घेणार आहेत.



हेही वाचा

३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर... राज ठाकरेंचा इशारा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा