Advertisement

नेत्यांसह अभिनेतेही प्रचाराच्या मैदानात


नेत्यांसह अभिनेतेही प्रचाराच्या मैदानात
SHARES

मुंबई - महापालिका निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याचा फायदा घेत उमेदवार सकाळपासूनच प्रचाराला लागले. या प्रचारात नेत्यांसह अभिनेतेही उतरले आहेत. मराठीतला सुपरहिट सिनेमा टाईमपास चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब उर्फ दगडू आणि हिंदी सिनेमातील अभिनेता विनीत शर्मा यांनी शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 165 चे उमेदवार प्रकाश शुक्ला यांच्यासह प्रचार केला. मतदारांना दोन्ही अभिनेत्यांनी प्रकाश शुक्ला यांना निवडून देण्याचं आवाहन केले. या अभिनेत्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी त्यांच्यासोबत हात मिळवून सेल्फी सुद्धा काढले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा