Advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, पण...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे... पण

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, पण...
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली होती. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे... पण राजकारणात नाही तर लग्न समारंभात...  

राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे एकत्र दिसले. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी विद्यालयात हा लग्नसोहळा पार पडला. त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. यानंतर राज आणि उद्धव ठाकरे राजकीय पटलावरही एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू झाल्यात. 

शिवसेना आणि काँग्रेस पक्षासाठी ठाकरे भेटीचा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी तो राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. कारण एकीकडे पक्षफुटीमुळे शिवसेना उबाठाची ताकद निम्मी झालीय. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या दोघांचं पानिपत झालंय.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने भाजपला थेट फटका बसू शकतो. त्यामुळं सध्या लग्नात एकत्र दिसलेले ठाकरे बंधू भविष्यात राजकीय व्यासपीठावर हातात हात घेऊन उभे राहतात का याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष असेल.



हेही वाचा

अमोल किर्तीकरांची याचिका फेटाळली

शिवसेना BMC निवडणूक एकट्याने लढवण्याची शक्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा