मुलुंड - मनसे नेते सत्यवान दळवी यांच्या मुलुंडमधील कार्यालयाचं उद् घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद् घाटन सोहळ्याच्या निमित्ताने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना कसे मार्गदर्शन करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु निवडणुकीबद्दल काहीही न बोलता राज ठाकरे यांनी उद् घाटन सोहळा आवरता घेतला.