मुंबईतील मंत्रालयाच्या गेटसमोर दूध ओतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी अनोखं आंदोलन केलं. पोलिसांनी त्वरीत मध्यस्ती करत शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांचे व्यापारी भागीदारी असलेले राष्ट्र (भारत, चीन, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, दक्षिण कोरिया) रिजनल काॅम्प्रहेन्सिव इकाॅनाॅमिक पार्टनरशीप (आरसेप) या व्यापारविषयक करारावर बँकाॅक येथील बैठकीत सह्या करणार आहेत.
यामुळे शेतीआधारीत व्यापारावरील आयातशुल्क कमी होऊन भारतात परदेशातील मालाची आयात वाढेल आणि भारतातील शेतकरी अडचणीत येतील, असं स्वाभिमानीचं म्हणणं आहे.
प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरीत रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी दुधाच्या पिशव्या फाडून त्यातील दूध गेटसमोर ओतलं. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं.
भारत १६ देशांसोबत करत असलेल्या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योगाला बसणार असल्याने हा करार त्वरीत थांबवण्यात यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. तसंच कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.हेही वाचा-
भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?
शपथविधीसाठी भाजपाने बुक केले वानखेडे स्टेडियम