लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर ठेऊन ठेपलेल्या असताना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'यापुढे लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा करून सगळ्यांनाच धक्का दिला. मात्र ही घोषणा करून २४ तासही उलटत नाही, तोच 'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, मी राजकीय संन्यास घेणार नाही' असं म्हणत पाटील यांनी शुक्रवारी घुमजाव केलं.
गुरूवारी कोल्हापूरमधील जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित 'गणराया अॅवाॅर्ड' वितरण सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यापुढे लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र त्यानंतर पाटील यांनी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासा केला.
राजकीय संन्यास घेणं हे आमच्या हातात नसतं. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावं लागतं. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं, त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा-
'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?
महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा