Advertisement

मुंबईला अदानीपासून वाचवा : विजय वडेट्टीवार

मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानी कंपनीला दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मुंबईला अदानीपासून वाचवा : विजय वडेट्टीवार
SHARES

महायुती सरकारच्या काळात मुंबईची (mumbai) सर्रास लूट केली जात होती. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जमीन अदानींच्या खिशात आहे. मुंबईची लूट करणाऱ्या अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत. अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay vadettiwar) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी मुंबईला अदानीपासून (adani) वाचवा, असा टोला देखील लगावला.

मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागेच्या मुद्द्यावरून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी कंपनीला दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कुर्ल्यातील (kurla) साडेआठ हेक्टर डेअरीची जमीन अदानीला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 10 जून रोजी ही जमीन पशुसंवर्धन विभागाकडून महसूल विभागाकडे आणि त्यांचाकडून त्याच दिवशी अदानीकडे हस्तांतरित करण्यात आली. ही बदली एका दिवसात झाली. 

सुमारे 20 हजार कोटी रुपयांची ही जमीन रेडी रेकनर दराच्या केवळ 25 टक्के दराने देण्यात आली आहे. यावर विरोधी पक्षनेत्यांनीही आक्षेप घेतला. या जमिनीच्या हस्तांतरणाबाबत तत्कालीन पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांनी आक्षेप घेतल्यानेच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार (vijay vadettiwar) यांनी केला. 

तसंच मुंबईतील मिठागर आणि महापालिकेच्या जकात नाक्यांची जागा अदानीला देण्यात आली नाही, असं भाजप नेते सांगत होते. त्यांचा दावा आता खोटा ठरला असून राज्याचे प्रमुख नेते अदानी यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विरोधक सरकारचा निषेध करत सभेतून निघून गेले.



हेही वाचा

भुशी धरणात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर : अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा