वांद्रे - राज्यात आणि केंद्रातही पारदर्शी कारभार हवा असं सांगत शिवसेनेने भाजपाच्या पारदर्शी अजेंड्यावर पलटवार केला आहे. शिवेसेनेलाही पारदर्शकता हवी आहे असं सांगत शिनसेना आमदार अनिल परब यांनी भाजापाच्या पारदर्शी अजेंड्याची चांगलीच खिल्ली उडवली. नोटबंदीचा जो निर्णय घेतला गेला त्यावेळी पारदर्शकता का दाखवली नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नोटाबंदीचा निर्णय जर पारदर्शी असता तर एवढा गोंधळ झालाच नसता अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि पत्रकार यांना बसण्याची अनुमती द्यावी जेणेकरून पारदर्शक कारभार करता येईल असंही अनिल परब यावेळी म्हणाले. तसेच किरीट सोमय्या यांच्याकडे शिवसेना गंभीरपणे बघत नसल्याचे सांगत सोमय्यांनी त्यांची भूमिका भाजपाची असल्याचे घोषित करावे तेव्हा आम्ही त्यांना गंभीरपणे घेऊ असं सांगत सोमय्यांवर जोरदार हल्ला केला.