Advertisement

बालहट्टासाठी 80 टक्के मराठी माणसांवर अन्याय


बालहट्टासाठी 80 टक्के मराठी माणसांवर अन्याय
SHARES

मुंबई - पालिकेचा लीज धोरणासंबंधीचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुर होत असताना जे तोंड शिवून बसले होते, त्यांनी सभागृहात मात्र शिमगा घातला. हा शिमगा का घातला, कुणाच्या सांगण्यावरून घातला, याचं उत्तर शिमगा घालणाऱ्यांना द्यावे लागेल, अशा शब्दात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पुन्हा वार केला आहे. लीज धोरण मंजुर झाले तर शिवसेनेचे रेसकोर्सवरील थीमपार्कचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनं सभागृहात हा प्रस्ताव रोखून धरला. यासंबंधी बोलताना शेलार यांनी बालहट्टासाठी लीज भूखंडावरील 80 टक्के मराठी माणसांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. तर, बिल्डरांच्या दबावाला बळी पडत शिवसेनेना हा प्रस्ताव रोखल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या द्वैवार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन गुरूवारी पालिकेच्या वार्ताहर कक्षात शेलार यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी लीज धोरणावरून शिवसेनेवर जोरदार टिका केली.

‘युतीचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर’ 
पालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील का यासंबंधीचे चित्र अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी युतीबाबत विचारलं असता शेलार यांनी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली असं स्पष्ट केलं आहे. स्वबळावर लढू न लढू पण भाजपाला स्वबळ मिळवून देणं हाच आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा