Advertisement

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, शिवसेनेची मागणी

सध्या देशभर नाव बदलण्याचं वारं वाहात असतानाच समृद्धी महामार्गाचं नाव बदलण्याचीही मागणी होतं आहे. एकीकडे शिवसेनेकडून समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध होत असताना त्याच शिवसेनेकडूनच समृद्धी महामार्गाचं नाव बदलण्याची मागणी होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या, शिवसेनेची मागणी
SHARES

मुंबई ते नागपूर अशा ७१० किमी अंतराचा समृद्धी महामार्ग आधीच विविध कारणांमुळं वादात अडकला आहे. त्यात या महामार्गाच्या नावावरूनही राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदार-आमदारांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी एक पत्र लिहित समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपा या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची तयारी करत असल्याचं समजत आहे.


आश्चर्यजनक मागणी

सध्या देशभर नाव बदलण्याचं वारं वाहात असतानाच समृद्धी महामार्गाचं नाव बदलण्याचीही मागणी होतं आहे. एकीकडे शिवसेनेकडून समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध होत असताना त्याच शिवसेनेकडूनच समृद्धी महामार्गाचं नाव बदलण्याची मागणी होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


काय आहे पत्रात?

मुंबई-पुणे द्रुतगती या देशातील पहिल्या वहिल्या महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरे यांनीच रोवली. मुंबई-पुणे शहराला एकमेकांशी जोडत या २ शहरांतील अंतर केवळ २ तासांत पार करता यावं हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि १९९५ मध्ये शिवसेना सत्तेत आल्यास त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात करून दाखवलं.

त्यामुळं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत राज्याच्या विकासात मोठं योगदान देत आहे. त्यामुळं राज्यातील दुसरा मोठा महामार्ग साकारत असताना त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं ही शिवसेनेच्या खासदारांची आणि आमदारांची मागणी असल्याचं शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

राज्याचा चेहरामोहरा बदलत राज्याच्या विकासात मोठी भर समृद्धी महामार्गामुळं पडणार आहे. तेव्हा अशा या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देणं योग्य ठरणार असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.



हेही वाचा-

'समृद्धी' नवा टोलझोल... महामार्गावर तब्बल ३१ टोल

'समृद्धी'साठीच मोपलवारांना एक वर्षांची मुदतवाढ



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा