Advertisement

प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू; आदित्य ठाकरेंचा निरूपम यांना टोला

निरूपम यांच्याविरोधात मुंबईभर रोष व्यक्त होताना दिसत आहे. सर्व पक्षांकडून निरूपम यांच्यावर टीका होत आहे. मनसेनं निरूपम यांची तुलना परप्रांतीय भटक्या कुत्र्याशी करत सोमवारी एकच खळबळ उडवून दिली होती.

प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू; आदित्य ठाकरेंचा निरूपम यांना टोला
SHARES

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या मुंबई बंद पाडण्याबाबतचं वादग्रस्त विधानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निरूपम यांचा खरपूस समाचार घेतला अाहे. प्लास्टिक बंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू , असा टोला लागवत आदित्य ठाकरे यांनी निरूपम यांची तुलना निरूपयोगी प्लास्टिकशी केली आहे.


वादग्रस्त वक्तव्य

उत्तर भारतियांच्या नागपूरमधील एका सभेत निरूपम यांनी महाराष्ट्र, मुंबई ही उत्तर भारतीयांमुळेच चालते असं वादग्रस्त वक्तव्य केलं. अगदी सकाळी घरात येणाऱ्या दूध-पेपरपासून ते टॅक्सी-रिक्षा, भाजी सर्व काही मुंबईकरांना मिळतं ते उत्तर भारतीयांमुळेच. त्यामुळं उत्तर भारतीयांनी जर एक दिवस काम बंद करायचं ठरवलं तर मुंबईकरांना भाजीदेखील मिळणार नाही. ते उपाशी राहतील, असही वक्तव्य निरूपम यांनी केलं.


मुंबईभर रोष

या वक्तव्यानंतर निरूपम यांच्याविरोधात मुंबईभर रोष व्यक्त होताना दिसत आहे. सर्व पक्षांकडून निरूपम यांच्यावर टीका होत आहे. मनसेनं निरूपम यांची तुलना परप्रांतीय भटक्या कुत्र्याशी करत सोमवारी एकच खळबळ उडवून दिली होती. तर आता आदित्य ठाकरे यांनीही निरूपमांना ठोकण्याची संधी सोडलेली नाही. एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना निरूपम यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं असता, एका वाक्यात त्यांनी निरूपम यांची खिल्ली उडवली आहे. मी प्लास्टिकबंदीवर बोलतो, प्लास्टिकवर नाही. त्यामुळे प्लास्टिकबंदीवर बोलू, प्लास्टिकवर नंतर बोलू असा टोमणा मारत त्यांनी निरूपम यांची खिल्ली उडवली.



हेही वाचा - 

राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार?

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा