रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदतीचे चेक देण्यात आले होते. परंतु हे मद
याबाबत अधिक माहिती देताना अनिल परब यांनी सांगितलं की, मी स्वत: जाऊन पोसरे गावात पूरग्रस्तांना सरकारी मदतीचे चेक देऊन आलो होतो. पण चेक दिलेली बँक ३० किलोमीटर लांब असल्याने तिथं जाण्यास अडचण येईल. शिवाय पूरग्रस्तांची घरं, बँकांसंदर्भातील कागदपत्रं पाण्यात गेल्याने खातेक्रमांक सापडण्यास अडचणी येत होती. एवढंच नाही तर चिपळूणच्या सर्व बँका पुराच्या पाण्याखाली गेल्याने शासनाच्या प्रतिनिधीने हे चेक परत घेतले आणि स्वत: इतर शाखांत जाऊन सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे.
हेही वाचा- कोश्यारी घटनात्मक पदापेक्षा RSS साठीच काम करताना दिसतात- नितीन राऊत
शिवाय रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी याबाबत खुलासा करताना म्हटलं की, चेक वाटपाबाबत बातमी चुकीची होती. खेडमधल्या पोसरेमधील ४ मृतांच्या वारसांना चेकचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांच्याकडे बँक खाते क्रमांक देखील नव्हता. तसंच बँकही ३० किमी लांब होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या विनंतीनुसार संबंधित तलाठ्यांनी हे चेक परत घेऊन पैसे थेट बँकेत जमा केले. सध्याच्या घडीला सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
हेही वाचा- “राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं