Advertisement

शरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा'! शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला

शरद पवारांकडे हर मर्ज की दवा असल्याचा टोला शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मारला.

शरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा'! शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला
SHARES

वाढीव वीज बिल आणि दूध दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याशी चर्चा करा, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांना फोन केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांकडे हर मर्ज की दवा असल्याचा टोला शिवसेना नेत्याने राज ठाकरेंना मारला.

राज्यातील वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत वाढीव वीज बिल आणि दूध दराच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले आहेत. सर्वसामान्यांच्या हाती पैसे नाहीत. अशा स्थितीत ज्यांना महिन्याला हजार वीज बिल (electricity bill hike) यायचं त्यांना १० हजार बिल आलं आहे. ज्यांना ५  हजार बिल यायचं त्यांना २५ हजार बिल आलं आहे. वीज कंपन्यांनी यावर तोडगा काढावा. राज्य सरकारनं त्यासाठी प्रयत्न करावा व राज्यपालांनी या संदर्भात सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी राज यांनी कोश्यारींकडे केली. (shiv sena mla abdul sattar slams mns chief raj thackeray over electricity bill hike)

हेही वाचा- राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन, पण…

त्यावर याप्रकरणी शरद पवार यांच्याशी बोला, असा सल्ला राज्यपालांनी राज ठाकरे यांना दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी पवारांना फोन करून या मुद्द्यावर चर्चा केली असली, तरी बाहेरगावी चालल्यामुळे राज ठाकरेंच्या भेटीबाबत अद्याप काही ठरलेलं नाही, अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली.

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी (shiv sena mla abdul sattar) राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यात अडचण वाटत असेल त्यामुळेच राज्यपालांनी त्यांना शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला असावा, कारण ‘शरद पवारांकडे हर मर्ज की दवा है’ असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

वीज बिलाबाबत मनसेनं आंदोलनं केली, बेस्ट, अदानीसह इतर वीज कंपन्यांचे प्रतिनिधी भेटून गेले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्यास वीज बिलात सवलत देण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने एमईआरसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनीही सकारत्मकता दाखवली. परंतु अजूनही सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. केवळ प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जातं, असं राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी ५७० किमीचा पायी प्रवास, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा