एअर इंडियाच्या कर्मचा-्याला मारहाण केल्यामुळे वादाच्या भोव-्यात सापडलेले शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी शिवसेना भवनात भेट घेतली. यावेळी त्यांना या वादाबाबत विचारले असता 'एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने मला धक्काबुक्की केल्याने हे प्रकरण चिघळले. माझी चूक नाही तर मी माफी का मागू'? असं सांगत त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यालाच वेडं ठरवलं.
खासदार गायकवाड शनिवारी सकाळी राजधानी एक्स्प्रेसने मुंबईत पोहोचले आणि बोरीवली स्थानकात उतरले. यावेळी त्यांना एअर इंडिया वादाबाबत विचारले असता 'एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने मला धक्काबुक्की केल्याने हे प्रकरण चिघळले. माझी चूक नाही तर मी माफी का मागू'? असं सांगत त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला वेडं ठरवलं. माझी चूक नसल्यानेच आज माझा पक्ष माझ्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न उरत नाही असे सांगत त्यांनी याविषयी जास्त बोलणं टाळलं. 'मी दिल्लीला जात होतो. माझ्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट देखील होते. मात्र मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याचे सांगत त्यांनी मीडिया ट्रायलवर देखील नाराजी व्यक्त केली.