लोअर परळ - मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावलाय. सिताराम मार्गावरील सारंग बिल्डिंग आणि व्यायामशाळा नूतनीकरण, साईधाम बिल्डिंग आणि मजल्यावरील पॅसेजचे लादीकरण, दत्ता आयरे मार्गावरील चिनाई बिल्डिंगची दुरुस्ती अशा विकासकामांचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. आमदार सुनील शिंदे यांच्या आमदार विकास निधीतून ही विकासकामं केली जातायेत.