Advertisement

कर्नाटकात धनुष्यबाण सुटणार, शिवसेना लढवणार ५०-५५ जागा

कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. स्वबळावर कर्नाटक निवडणुका लढवण्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेनं पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे आता भाजापाच्या अडचणी आता वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कर्नाटकात धनुष्यबाण सुटणार, शिवसेना लढवणार ५०-५५ जागा
SHARES

महाराष्ट्रातील मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेनं आता महाराष्ट्राबाहेर पाळंमुळं रोवण्यास सुरूवात केली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर शिवसेनेनं आपला मोर्चा आता कर्नाटकाकडे वळवला आहे. कर्नाटकात निवडणुका लढण्याची घोषणा करत शिवसेनेनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.


किती जागा लढवणार?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंबंधीची घोषणा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली असून कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. स्वबळावर कर्नाटक निवडणुका लढवण्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेनं पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे आता भाजापाच्या अडचणी आता वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.


एकीकरण समितीला पाठिंबा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करतानाच अन्य राज्यातही शिवसेना स्वबळावर लढेल असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केलं आहे. त्यानुसारच कर्नाटकात निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.

कर्नाटकात ५० ते ५५ जागांवर शिवसेना आपले उमेदवार देणार आहे. तर ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडणुका लढवत असतील त्या ठिकाणी शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.


मुख्यमंत्र्यांना आव्हान

कर्नाटकात निवडणुका लढवण्याची घोषणा करतानाच राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही डिवचलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा, तरच ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे.



हेही वाचा-

गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार

युवासेनेला १००% मार्क्स, सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकल्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा