Advertisement

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी

शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अनिल परब यांना 44 हजार 784 मते मिळाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी
SHARES

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या वार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल लावण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. विजयासाठी 32 हजार 112 मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी झाले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या किरण शेलारांचा पराभव केला. अनिल परब 44 हजार 784 मतांनी  विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी किरण शेलार यांना 18 हजार 772 मतं मिळाली. दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाचे ज.मो. अभ्यंकरही 649 मतांनी विजयी झाले आहेत.. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.

उमेदवारांना मते मिळाली

१) अधिवक्ता अनिल विजया दत्तात्रेय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना : 44 हजार 784 (विजय)

2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पक्ष : 18 हजार 772

३) योगेश बालकदास गजभिये : 89

४) अधिवक्ता अरुण बेंडखळे, अपक्ष : 39

५) अधिवक्ता उत्तम कुमार (भाऊ) नकुल सजनी साहू, अपक्ष: 11 

६) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष : 464

७) रोहन रामदास साठों, अपक्ष : 26

८) अधिवक्ता हत्तरकर सिद्धार्थ (सिद्धरामेश्वर), अपक्ष : 37



हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते धर्मवीर 2 चित्रपटाचे पोस्टर रिलीज

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Budget 2024: महायुती सरकारकडून महिलांसाठी घोषणांचा पाऊस">Maharashtra Budget 2024: महायुती सरकारकडून महिलांसाठी घोषणांचा पाऊस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा