शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह १७ जणांना मुंबई सत्र न्यायालयानं एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात एक पोलीस शिपाई जखमी झाले होते. त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणी कामिनी शेवाळे यांच्यासह १७ जणांविरोधात खटला दाखल केला होता. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायलयानं तुर्तास त्यांना जामीन मंजूर केला आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे पैसे वाटल्याच्या आरोपावरुन मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनंतर त्यांच्यात झालेल्या झटापटीत त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विकास थोरबोले जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांवर आयपीसी कलम १४९ आणि ४२७ अंतर्गत मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा आरोप दाखल केला होता.
याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसंच, मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश डी के गुदाधे यांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्न या आरोपातून सर्व आरोपींची सुटका केली आहे.
हेही वाचा -
राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका