Advertisement

जागावाटपावरुन 'मविआ'मध्ये खलबते

मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.

जागावाटपावरुन 'मविआ'मध्ये खलबते
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (maha vikas aaghadi) जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू आहेत.

मुंबईतील 36 जागांपैकी काही जागांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. असे असताना मुंबईतील (mumbai) मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या पाच जागांवर मात्र आघाडीतील कोणत्याही पक्षांनी अद्याप दावा केलेला नसल्याचे समजते. या पाचही जागांवर भाजपचे आमदार असून, पराभवाच्या भीतीनेच अद्याप या जागांवर दावा करण्यात आला नसल्याचे समजते.

मुंबईतील (mumbai) विधानसभेच्या 36 जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे.

मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (shivsena ubt)आणि काँग्रेस (congress) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. काही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही (ncp sharad pawar) आग्रह धरला आहे. त्यामुळे काही जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे.

एकीकडे काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला असताना, मुंबईतील पाच जागांवर मात्र आघाडीमधील अद्याप एकाही पक्षाने दावा केला नसल्याचे समजते.

यामध्ये मुंबईतील मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या पाच जागांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. या जागांवर निवडणूक लढवली तर आपला पराभव होईल अशी भीती महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना असल्याचे समजते. त्यामुळे या जागा आपल्याकडे येण्यापेक्षा आपल्या मित्रपक्षांकडे जाव्यात यासाठीच अद्याप या जागांवर कोणी दावा केला नसल्याचे समजते.

‘पवारांची राष्ट्रवादी’ सात जागांसाठी आग्रही
मुंबईमधील सात विधानसभा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) शरद पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते.

यात अणुशक्ती नगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश असल्याचे कळते.


अदलाबदलीची शक्यता?
मुंबईतील 22 जागांवर ठाकरे यांच्या शिवसेनेने, तर 18 जागांवर काँग्रेसने दावा केल्याचे कळते.

याशिवाय काँग्रेसकडे असलेल्या धारावीसाठी ठाकरे यांची शिवसेना, तर सेनेकडे असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे या जागांची आदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



हेही वाचा

आज मध्य रेल्वेच्या 12 एसी गाड्या नॉन-एसी म्हणून धावणार

17-18 सप्टेंबरला 8 अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा