महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानुसार निवडणुकीदरम्यान कुठल्याही प्रकारे एक्झिट पोल सादर करण्यास निवडणूक आयोगाने वृत्तपत्र तसंच न्यूज चॅनल यांना मनाई केली आहे. सोबतच मतदान झाल्यानंतर पुढील ४८ तास ओपिनियन पोल दाखवण्यासही मनाई करण्यात आली आहे.
राज्य विधानसभेसाठी २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार असून २४ आॅक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा इथं लोकसभा पोटनिवडणूक देखील होणार आहे.
यामुळे दक्षता घेत निवडणूक आयोगाने वृत्तपत्र तसंच इलेक्ट्राॅनिक मीडियाला २१ आॅक्टोबर सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत निवडणूक सर्वेक्षण किंवा निकालासंर्भातील कुठलाही अहवाल (एक्झिट पोल) सादर करण्यास मनाई केली आहे. तसंच मतदान झाल्यानंतर पुढील ४८ तासांत ओपिनियन पोल किंवा अन्य निवडणूक सर्वेक्षण सादर करण्यासही मनाई केली आहे.
हेही वाचा-
राष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट
भाजपा-शिवसेना राज्यात ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे