विरार - भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर एक जाहीरात झळकतेय. डोमेन म्हणजेच ड्रीम बीजंट असं या जाहीरातीत झळकणाऱ्या कंपनीचं नाव आहे. राष्ट्रपतींच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर गेल्यावर त्याच्याखालीpresidentofindia@rb.nic.in आणि त्यानंतर http://dreambigent.com/ ही लिंक येते. http://dreambigent.com/ क्लिक केल्यावर एक डोमेनची वेबसाईट ओपन होते. या घटनेला समोर आणलंय विरारमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर रहिम नरसिंगदानी यांनी. त्यांनी ट्विटरवरुन एक लिंक शेअर केली आहे, त्यासोबत एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे.
To @RashtrapatiBhvn ,
— RAHIM NARSINGDANI (@rahim1912) 21 March 2017
Plz check ur fb page the website which u have shown is https://t.co/Zb4YP8QCus Want 2 know is this ur official website pic.twitter.com/ulOa6i0RS6
त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक पेजवर झळकत असलेल्या ड्रीम बीजंट या कंपनीच्या जाहिराती दिसतील.