सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील आता भाजपकडून (bjp) लक्ष्य केलं जात असून त्यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता, अनिल देशमुख अत्यंत उत्तमरित्या काम करत असून त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी सांगितलं.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि या प्रकरणातील संशयित मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातील कथित सहभागाच्या मुद्द्यावरून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणातील मुंबई पोलिसांकडून (mumbai police) होत असलेला तपास आणि सचिन वाझे यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी यामुळे गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण येत आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात लाॅकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध, राजेश टोपेंनी केलं स्पष्ट
There is no question of taking resignation of the Home Minister. He is doing his work very well: Jayant Patil, NCP Maharashtra President. pic.twitter.com/uNNPwjZIHb
— ANI (@ANI) March 15, 2021
सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रामुख्याने विरोधकांच्या निशाण्यावर असले, तरी गृहखात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावल्याने अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याकडून राजीनामा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले की, सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हा तपास एटीएसकडे राहिला असता तरी सत्य पुढे येणारच होतं. तपास पूर्ण झाल्यावर कोणत्याही प्रकारचं सत्य बाहेर आल्यावर ते सत्य न दडवता आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. त्यात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
राहीला प्रश्न गृहमंत्र्यांचा तर अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित कारभार करत आहेत. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, परिणामी कुठल्याही वावड्या उठवण्याची गरज नाही, असं म्हणत जयंत पाटील (jayant patil) यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.
(there is no question of taking resignation of maharashtra home minister anil deshmukh says jayant patil)