Advertisement

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून ५ लाख दिव्यांचं वाटप

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येत राम मंदिरासाठी मार्ग मोकळा केल्यानंतर ही पहिली दिवाळी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून ५ लाख दिव्यांचं वाटप
SHARES

शहर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीनं दिवाळीच्या दिवशी प्रेमाचा संदेश देण्यासाठी मुंबईत एक लाख दीवे वाटप करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शहर भाजपनं वाटप केलेल्या पाच लाख दिव्यांपैकी सुमारे एक लाख आमचे सदस्य वाटप करतील, असं मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येत राम मंदिरासाठी मार्ग मोकळा केल्यानंतर ही पहिली दिवाळी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. खान यांच्या मते अंधकाराविरूद्ध प्रकाशाचे प्रतीक आणि वाईटाविरूद्ध चांगलं अशाचे प्रतीक असलेल्या दिव्यांपेक्षा यापेक्षा कोणतीच भेट चांगली असू शकत नाही.

नरेंद्र मोदींच्या मोहिमेला चालना देण्याच्या उद्देशानं सोमवारी भाजपच्या मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी "स्वदेशी बाजार"चं उद्घाटन केलं. मोर्चाचे स्वयंसेवक बहुधा गरीबांना दिवे पोहोचवणार आहेत. सर्व देशभर असलेल्या लॉकडाउनमुळे गरीबांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पक्षानं त्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश पसरवण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

दरम्यान, फटाके फोडण्यापूर्वी किंवा दिवे लावण्याआधी किंवा सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर्स न वापरण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे. सॅनिटायझर्स ज्वलनशील असल्यानं त्याऐवजी पाणी आणि साबण वापरण्याची शिफारस केली आहे.

दिवाळीच्या अगोदर, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सोमवारी शहरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी फटाके फोडण्यासाठी काही नियमावली लागू केली आहे.

तथापि, नागरी संस्थेनं लक्ष्मीपूजनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोसायटीच्या परिसरातील किंवा त्यांच्या घराबाहेर असलेल्या मुलांसाठी अनार, फुलझारी यासारख्या कमी प्रदूषक किंवा सौम्य फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.



हेही वाचा

गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा