- पुढच्या ५-६ महिन्यांत मंदी वाढणार असं आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल म्हणतात. म्हणजे लोकांच्या नोकऱ्या जाणार.
- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रीपदावरुन काढलं.
- बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी, नंतर बाेलके पोपट आले.
- बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा मुंबईत ढोकळा स्वस्त मिळतो.
- मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार काय?
- बुलेट ट्रेनसाठी काढलेलं १ लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देश फेडत बसणार, हे चालणार नाही.
- माझ्यासमोर उभ केलेलं गुजरातच्या विकासाच चित्र खोट होतं.
- 'विकास वेडा झालाय' हे स्लोगन भाजपामधूनच आलेय.
- देशातले सर्व प्रश्न माहित होते, असा यांचा दावा. मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत?
- मोदी बोलतात धोरणांवर टीका करण म्हणजे देशाविरोधात बोलणं, मला सांगा मोदी म्हणजे देश का?
- निवडणूक आयोग, न्यायाधीश आणि संपादकांना मी विनंती करतो त्यांनी सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नये, सरकार दर ५ वर्षांनी बदलतं.
- लाईट घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच.
- केबल बंद करुन, वीज गायब करुन आमचा विरोधाचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)