केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले (८८) यांचे गुरुवारी अल्प आजाराने मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत ठेवण्यात आले. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर खेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने रामदास आठवले यांना सांभाळले. दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी करून त्यांनी रामदास आठवले यांचे शिक्षण पूर्ण केले. रामदास आठवले यांनी जेव्हा पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही त्या शेतात मजुरी करत होत्या. याचवर्षी जुलै महिन्यात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी हौसाबाई आठवले यांचा सत्कार केला होता.