Advertisement

शरजील कुठेही असला, तरी त्याला अटक करू- अनिल देशमुख

शरजील बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

शरजील कुठेही असला, तरी त्याला अटक करू- अनिल देशमुख
SHARES

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात असताना शरजील बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिलं आहे. 

पुण्यात ३० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त भाषणाची व्हिडिओ क्लिप तपासून राज्याच्या गृहविभागाने शरजील विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. यानंतर शरजील विरोधात गुन्ह्याची नोंद होऊनही त्याला अटक का करण्यात येत नाही? असा प्रश्न भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला.

विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील उस्मानी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक युवक राज्यात येतो, छातीठाेकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही. हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानाचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

हेही वाचा- हिंदू समाजाला सडका बोलणाऱ्या सरजीलला अटक करा, नाहीतर... : फडणवीस

यावर प्रसारमाध्यमांनी अनिल देशमुख (anil deshmukh) यांना प्रश्न विचारला असता, पुण्यात ३० तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, आजचा हिंदू समाज, भारतातील हिंदू समाज सडलेला आहे. लिंचिंग करणारे हे लोक खून करतात. जर ते मारल्यानंतर त्यांच्या घरी गेले तर ते स्वत: काय करतील? काही जण नवीन पद्धतीनं हात धुवायचे, काही औषधोपचार करून अंघोळ करायचे. हे लोक काय करतात जे आपल्यामध्ये परत येतात आणि खातात, बसतात आणि चित्रपट पाहतात. दुसर्‍या दिवशी ते एखाद्याला पकडतात, त्यांची हत्या करतात आणि नंतर सामान्य जीवन जगतात, अशा आशयाचं वक्तव्य शरजील याने केल्याचं फडणवीस यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

(we will find and arrest sharjeel usmani says maharashtra home minister anil deshmukh)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा