Advertisement

आम्ही जाहिरात करत नाही - सुप्रिया सुळे


आम्ही जाहिरात करत नाही - सुप्रिया सुळे
SHARES

कुरारगाव – गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप भाषणं केली, बदल मात्र काडीमात्र झाला नाही. आम्ही आमची जाहिरात करत नाही, फेअर लव्हली क्रिम लावल्याने मी ऐश्वर्या होऊ शकत नाही. जास्त न बोलता शांतपणे काम करणारा एकच राष्ट्रवादी पक्ष असल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मुंबईत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास पेंग्विन पार्क बांधण्याचा कार्यक्रम करणार नाही, तर प्रत्येक शाळेतील मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल हा पहिला राष्ट्रवादीचा कार्यक्रम असेल, अशा शब्दांत शिवसेनेच्या युवा सेना प्रमुखांच्या पेंग्विन प्रेमावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महापालिकेच्या प्रचार मोहिमेला मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते सुरुवात झाली. मालाड पूर्वेकडील कुरारगाव येथील वॉर्ड क्रमांक 37 च्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान नगरसेविका रुपाली रावराणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कुरारगावातील प्रतापनगर येथे रुपाली रावराणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा पेडणेकर, आमदार विद्या चव्हाण, माजी नगरसेवक अजित रावराणे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा