Advertisement

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार?


दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार?
SHARES

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांसोबतच सर्वच राजकीय पक्षांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून एल्फिन्स्टनला झालेल्या चेंगराचेंगरीवरुन सरकारवर घणघणाती टीका केली आहे. आज नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया! असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी संपादकीयामधून सूचक इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये विविध विषयांवरुन सुंदोपसुंदी सुरु आहे. मग तो बुलेट ट्रेनचा विषय असो, मुंबईचा विकास असो, अच्छे दिन असो किंवा मग अगदी काल घडलेली अमानवी एलफिन्स्टन चेंगराचेंगरीची दुर्घटना असो. एमटीएनएलसारख्या सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही राज्यात विधिमंडळापासून थेट संसदेपर्यंत शिवसेनेचे आमदार-खासदार सरकारचा पिच्छा पुरवत आहेत. त्यामुळे अशा सरकारमध्ये शिवसेना रहाणार की नाही याची चर्चा सध्या सुरु आहे. आणि दसरा मेळाव्याचा इतिहास आणि दसऱ्याच्या निमित्ताने सामनामध्ये प्रकाशित झालेले संपादकीय पहाता आजच्या दसरा मेळाव्यामध्ये काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

बुलेट ट्रेनची मस्ती ही एल्फिन्स्टनच्या पुलावर २२ निरपराध्यांचा प्राण घेऊनही शांत झाली नसेल तर त्या बुलेट मस्तीची नशा उतरवण्याचा विडा उचलूया. शिवसेनेने आपली शस्त्र शमीच्या झाडावर कधीच ठेवली नाहीत. म्हणून विचारांचा आणि लढायांचा खणखणाट महाराष्ट्रात सुरू असतो. आज नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया! असेही सामनाच्या संपादकीयामध्ये म्हटले आहे.


सामनाचे पूर्ण संपादकीय वाचण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.saamana.com/shivsena-start-new-war/



हेही वाचा

ठोकशाही आम्ही दांडक्याने मोडून काढू - उद्धव ठाकरे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा