मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आमदार आणि खासदार यांच्या खात्याची माहिती मागवलीय. या निर्णयाचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलंय. भाजपा नेहमीच पारदर्शकता ठेऊन पुढे वाटचाल करते. एक चांगल्या पक्षाची भुमिका अशीच असावी. काही पक्षांना अशा गोष्टींचा त्रास होतोय. मात्र मी स्वत: माझ्या बँकेचे डिटेल्स पाठवून देणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.