शिवसेना - उद्धव ठाकरे गट हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणारा महाविकास आघाडी (MVA) मधील पहिला पक्ष ठरला आहे. यादी बाहेर आल्यानंतर, काँग्रेसने मित्रपक्ष शिवसेनेसाठी (UBT) मुंबईची वांद्रे पूर्व जागा सोडल्याचेही समोर आले.
तथापि, सेना यूबीटीने वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर, विद्यमान आमदार झीशान सिद्दिकी यांनी "एकत्र राहणे त्यांच्या स्वभावात कधीच नव्हते" असे म्हणत काँग्रेसला फटकारले.
उद्धव ठाकरे यांनी 65 उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे यांनी अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीमधील एका उमेदवाराच्या नावाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, ते नाव म्हणजे वरुण सरदेसाई!
शिवसेनेने (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्य मतदारसंघ म्हणजेच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे यांनी वरुण यांना पक्षाचा एबी फॉर्म देखील दिला.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वांद्रे पूर्वमधून उमेदवार जाहीर केल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईल त्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!”
हेही वाचा