Advertisement

महारेरात तक्रार करणं झालं सोपं


महारेरात तक्रार करणं झालं सोपं
SHARES

महारेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन एक वर्षे झालं असून महारेराकडं मोठ्या संख्येनं तक्रारी येत आहेत. महारेरात दाद मागितलेल्या तक्रारदारांना न्यायही मिळत आहे. असं असलं तरी महारेराकडे तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदारांना महारेरा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. तक्रारदारांची ही गैरसोय लक्षात घेत महारेरानं तक्रार नोंदवण्यापासून तक्रारीची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतच्या सर्व बाबी आॅनलाईन केल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. महारेराच्या या निर्णयामुळं तक्रारदारांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.


काय आहे प्रक्रिया?

महारेरा कायद्यानुसार नोंदणीकृत बिल्डरच्याविरोधात ग्राहकांना न्याय मागायचा असेल तर ग्राहक-तक्रारदाराला महारेराच्याsourcedetails@maharera.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी लागते. त्यानंतर ही तक्रार दाखल करवून घेण्यासाठी महारेरा कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रं सादर करावी लागतात. महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तक्रारदार सर्व कागदपत्रांची प्रत सादर करत नाही, तोपर्यंत महारेराकडून तक्रार दाखल करून घेतली जात नाही.

त्यामुळं तक्रारदारांना महारेरात फेऱ्या माराव्या लागतात. पुढं तक्रारीच्या पाठपुराव्यासाठीही महारेरात यावं लागतं. तक्रारदारांची ही अडचण लक्षात घेता महारेरानं तक्रार करणं-तक्रार दाखल करवून घेणं सोपं केलं आहे. आता आॅनलाईनद्वारे घर बसल्या तक्रारदारांना तक्रार नोंदवता येणार आहे.

Advertisement



किचकट प्रक्रिया सोपी

सोबतच महारेरात कागदपत्र सादर करण्यासाठी फेऱ्याही माराव्या लागणार नाहीत. कारण सर्व कागदपत्रही आता आॅनलाईनच सादर करता येत आहे. एकूणच तक्रार दाखल करणं सोपं झाल्यानं तक्रारदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तक्रार दाखल करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळं अनेक ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी पुढं येत नसल्याचंही चित्र होतं. पण आता मात्र ही प्रक्रिया सोपी-सुटसुटीत झाल्यानं तक्रारदार पुढं येतील अशी प्रतिक्रिया मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.


बिल्डराविरोधात तक्रार करणंही सोपं

तक्रारदारांना नोंदणी न करणाऱ्या बिल्डरांची तक्रारही ई-मेलवरूनच नोंदवावी लागते. पण केवळ तक्रार नोंदवणंच नाही, तर तक्रारीची महारेरा काय, कशी दखल घेते हे तपसाणंही सोपं करण्यात आल्याचं प्रभू यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे महारेराच्या संकेतस्थळावर यासाठी स्वतंत्र काॅलम महारेरानं तयार केला असून त्यात तक्रारीसाठी अर्जही तयार करून दिला आहे. हा आॅनलाईन अर्ज भरून तक्रार करणं तक्रारदारांना अगदी सोपं झालं आहे. त्यामुळं महारेराच्या या निर्णयाचं ग्राहक-तक्रारदारांकडून स्वागत होत आहे.

Advertisement



हेही वाचा-

छोट्या सोसायट्यांना मोठा फायदा, निवडणुकीत मिळणार सूट!

प्राॅपर्टी वेबसाइट्सदेखील महारेराच्या कक्षेत आणा!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा