Advertisement

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी कोसळले

सेन्सेक्स मंगळवारी २२८ अंकांनी वधारून ३८,८१३.४८ वर उघडला. मात्र, त्यानंतर बाजार घसरण्यास सुरूवात झाली. रिझर्व्ह बँकेच्या आढावा पतधोरण बैठकीआधी गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला.

सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी कोसळले
SHARES

येस बँकेचे शेअर्स तब्बल २२.२० टक्क्यांनी कोसळल्याने आणि एसबीआय, भारती एअरटेल, ओएनजीसी, टीसीएस आणि इन्फोसिस आदी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीने मंगळवारी देशातील शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६१.९२ अंकांनी घसरून ३८,३०५.४१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १०७.१० अंकांची मोठी घसरण नोंदवत ११,३६७.९० वर स्थिरावला. निफ्टीतील ३९ कंपन्यांचे शेअर्स घसरले.

सेन्सेक्स मंगळवारी २२८ अंकांनी वधारून ३८,८१३.४८ वर उघडला. मात्र, त्यानंतर बाजार घसरण्यास सुरूवात झाली. रिझर्व्ह बँकेच्या आढावा पतधोरण बैठकीआधी गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला. तर जागतिक स्तरावरील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणुकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे दुपारपर्यंत सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी कोसळला. दिवसाअखेरीस मात्र सेन्सेक्स सावरला. 

येस बँकेचा शेअर्स २२.२० टक्के घसरून २९.०५ रुपयांवर आला. मोठ्या घसरणीमुळे येस बँकेचे बाजारमूल्य तब्बल ८ हजार कोटी रुपयांनी घटले. ओएनजीसी, टाटा स्टील, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, वीईडीएल, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, आईटीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, पाॅवरग्रिड, एलटी, सनफॉर्मा, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसीचे शेअर्स घसरून बंद झाले. वाहन, बँक, इन्फ्रा, एफएमसीजी, फार्मा आणि एनर्जी निर्देशांकात वाढ पहायला मिळाली. 




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा