Advertisement

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारूती, ओएनजीसी अादी हेवीवेट शेअर्समध्ये अालेल्या तेजीमुळे सेन्सेक्स प्रथमच ३८,३४०.६९ अाणि निफ्टी ११, ५६५ या एेतिहासीक उच्चांकावर गेला.

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर
SHARES

रुपयामध्ये अालेली मजबूती अाणि जागतिक सकारात्मक संकेत यामुळे सोमवारी देशातील शेअर बाजारांनी पुन्हा विक्रमी उच्चांक नोंदवला.  एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारूती, ओएनजीसी अादी हेवीवेट शेअर्समध्ये अालेल्या तेजीमुळे सेन्सेक्स प्रथमच ३८,३४०.६९ अाणि निफ्टी ११, ५६५ या एेतिहासीक उच्चांकावर गेला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३१ अंकाने वधारून ३८ हजार २७९ वर बंद झाला. तर निफ्टी ८१ अंकांची वाढ नोंदवत ११ हजार ५५२ वर स्थिरावला.


मिडकॅप, स्माॅलकॅपमध्येही खरेदी

सेन्सेक्सच्या तेजीत एल अँड टी अाणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा वाटा राहिला. सोमवारी बीएसईमधील १४५० शेअर्समध्ये तेजी राहिली. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) अायटी क्षेत्राचा निर्देशांक सोडून सर्व क्षेत्रांनी वाढ नोंदवली. लार्जकॅपबरोबर मि़डकॅप अाणि स्माॅलकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून अाली. अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली अाहे. कच्च्या तेलाचा भाव ६५ डाॅलरच्या खाली अाला अाहे. तेलातील दर घटीचा बाजाराला सपोर्ट मिळाला.


सेन्सेक्सची विक्रमी वाटचाल 

  • २० अाॅग. - ३८,३४०.६९ चा नवा उच्चांक 
  • ९ अाॅग.   - ३८,०७६.२३ चा विक्रमी उच्चांक
  • ८ अाॅग.   - ३७,९३१.४२ पर्यंत पोचला
  • ७ अाॅग.   - ३७,८७६.८७ या पातळीला स्पर्श
  • ६ अाॅग.   - ३७,८०५.२५  चा नवा उच्चांक
  • १ अाॅग.   - ३७,७११.८७ पर्यंत पोचला
  • ३१ जुलै  - ३७,६४४.५९ चा नवा उच्चांक
  • ३० जुलै  - ३७,५३३.५० चा नवा उच्चांक
  • २७ जुलै  - ३७,३६८.६२ चा नवा उच्चांक
  • २६ जुलै  - ३७,०६१.६२ चा विक्रमी उच्चांक
  • २५ जुलै  - ३६,९४७.१८ चा उच्चांक
  • २४ जुलै  - ३६,९०२.०६ च्या पातळीवर
  • २३ जुलै  - ३६,७४९.६९ या विक्रमी पातळीवर



हेही वाचा - 

 सिडकोकडूनच महारेराचं उल्लंघन, नोंदणीशिवाय काढली जाहिरात

४० लाखांसाठी लटकली १५० कोटींची मालमत्ता, आढमुठ्या बिल्डरला महरेराचा दणका




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा