Advertisement

लाॅन्गटर्म गेन टॅक्सच्या घोषणेने सेन्सेक्स घसरला


लाॅन्गटर्म गेन टॅक्सच्या घोषणेने सेन्सेक्स घसरला
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शेअर्समधून मिळणाऱ्या उत्पन्नावर लाॅन्गटर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्याची घोषणा करताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९ अंकांनी घसरून ३५,९०६ वर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० अंकांनी खाली येऊन ११,०१० वर आला.

जेटली अर्थसंकल्प सादर करत असताना सेन्सेक्स २१५ अंकांनी मजबूत झाला होता. परंतु लाॅन्गटर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या घोषणेनंतर सेन्सेक्स धाडकन ७०० अंकांनी कोसळला. पण बाजाराच्या अखेरीस पुन्हा एकदा रिकव्हरी करत सेन्सेक्स स्थिरावला. सलग ३ दिवस सेन्सेक्स घट नोंदवत बंद होत असल्याचं दिसत आहे.


कॅपिटल गेन टॅक्स किती?

जेटली यांनी शेअर्समधून मिळणाऱ्या १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या उत्पन्नावर १० टक्के लाॅन्गटर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. सद्यस्थितीत सरकारकडून शेअर्समधून मिळणाऱ्या उत्पन्नावर केवळ सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स ०.१० टक्के लावण्यात येतो.

तर १ वर्षांपेक्षा कमी कालावधीत शेअर्स विकून मिळवलेल्या नफ्यावर १५ टक्के शाॅर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. त्यात आता लाॅन्गटर्म कॅपिटल गेन टॅक्सची भर पडणार आहे. त्यानुसार १ वर्षांनंतर शेअर्स विकून १ लाख रुपयांचा नफा मिळवल्यास त्यावर १० टक्के म्हणजेच १० हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

दिवसभराच्या उलाढातील शेअर बाजारात फार मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळच्या सुमारास सकारात्मक वाटचाल करत असलेला सेन्सेक्स अरूण जेटली अर्थसंकल्प सादर करताना २१५ अंकांनी मजबूत झाला. पण लाॅन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्सची एकाएकी घोषणा करताच शेअर बाजार ७०० अंकांपर्यंत घसरला.
निफ्टीच्या ११ पैकी ८ सेक्टरच्या इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली तर मीडकॅप इंडेक्समध्येही घसरण झाली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा