तृतीयपंथींना समाजात नेहमीच एक वेगळी वागणूक दिली जाते. त्यांना कोणत्याच प्रकारचा सन्मान अथवा कामासाठी वाव मिळत नाही. पण मुंबईमध्ये सीपीएएच्या वैद्यकीय सर्वेमध्ये पाच ट्रान्सजेंडर महिलांनी व्यसन करणे पूर्णपणे बंद केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुंबईत आयोजिक केलेल्या कँसर पेशंट्स अॅड असोसिएशनतर्फे "तंबाखू आणि हृदयरोग" या संकल्पनेंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी कँसर पेशंट्स अॅड असोसिएशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनतर्फे तंबाखूविरोधीदिननिमित्त कार्यक्रम राबवले जातात. ज्यामध्ये सामान्य जनतेतील "हीरो"ना सन्मानित केलं जातं. गतवर्षी मुंबई पोलिस दलातील पाच पोलिसांना यशस्वीपणे तंबाखू सोडल्यामुळे सन्मानित केलं होतं, तर यावर्षी मुंबईतील विक्रम शिंदे, मोनिका कांबळे, प्रिया पाटील, माधुरी सरोदे आणि माही गुप्ता या पाचही महिलांचं कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सीपीएएतर्फे पार पडलेल्या "से नो टू टोबॅको अँड यस टू लाइफ" या कार्यक्रमात अभिनेते विवेक ओबरॉय, अनुपम खेर, नेहा भसीन, प्रिया दत्त यांची उपस्थिती होती.
प्रत्येकाला टेन्शन येतं म्हणून व्यसन करावंच असं नाही आणि याचं उदाहरण मी आहे. ट्रांसजेंडर असूनही मी आजपर्यंत मद्य किंवा तंबाखूचं सेवन केलं नाही, असं माही गुप्ता म्हणाल्या.
ट्रांसजेंडरला कोणतीही पर्सनल लाइफ नसतं असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हे कडाडीचं उत्तर होतं जेव्हा मी ट्रांसजेंडर असूनही एक सामान्य पुरुषाने माझ्याशी लग्न केलं, आणि आज आम्ही एक आदर्श जोडपं म्हणून समाजासमोर आहोत, असं वक्तव्य माधुरी सुरासे यांनी केलं.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी या पाच ट्रांसजेंडर्सचा संघर्ष पाहून तृतीयपंथातील लोकांना पुढे कँन्सर संदर्भात कोणतीही समस्या उद्भवल्यास टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मोफत उपचार होईल, असा दावा केला.
तंबाखूसेवन या केवळ वैयक्तिकच नाही तर सामाजिक दुष्परिणाम साधणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वच वयोगटांमध्ये तंबाखू सेवनाच्या सवयी वाढत आहेत, हे ऐकून धक्काच बसला. त्यातून एकूण सामाजिक प्रश्नांवर आपण सर मिळून एकत्रितपणे लढलं पाहिजे. तंबाखू खात नसल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी या मोहिमेला मनापासून मदत करणार आहे, अशी प्रतिक्रिया सीपीएए चा ब्रँड अँबॅसिडर आणि अभिनेता विवेक ओबोरॉय याने दिली.