Advertisement

टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत... मुंबई पोलिसांची नवी संकल्पना

आता संजय पांडे यांनी आणखी एक नवीन संकल्पना मांडली आहे.

टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत... मुंबई पोलिसांची नवी संकल्पना
SHARES

मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता संजय पांडे यांनी आणखी एक नवीन संकल्पना मांडली आहे.

मुंबई पोलिसांकडून काही कपडे आणि वस्तू तयार करण्यात येणार आहेत. या वस्तूंची विक्री करून मिळणारे पैसे मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापला जाईल, अशी माहिती आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे.


मुंबई पोलिसांकडून टी शर्ट, टोपी, कप, स्वेटर, ट्रकसूट, परफ्यूम, पाणी बॉटल यासारख्या विविध वस्तू बनवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांकडून बनवण्यात येणाऱ्या या वस्तू शोरूममध्ये विकल्या जातील. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे पोलिसांच्या कल्याण निधीसाठी वापरला जाईल, अशी माहिती संजय पांडे यांनी फेसबुकवरून संवाद साधताना दिली आहे.

त्यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही फोटो देखील आहेत. यात पाण्याच्या बाटल्या, परफ्यूम आणि मग यांचाही समावेश आहे. फोटोमध्ये असलेल्या या टोप्या पोलिसांच्या टोप्यांसारख्या नाहीत, असंही पांडे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून रविवारी मुंबईकरांसाठी 'संडेस्ट्रीट' सुरू करण्यात आले होते. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकारानं मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत.

मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते १० वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले.



हेही वाचा

मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून आले आनंद महिंद्रा

'काश्मीर फाइल्स' चित्रपट पहाल तर दुधावर सवलत मिळेल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा