Advertisement

गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत


गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
SHARES

जोगेश्वरी (पू) - कर्मवीर भाऊराव पाटील रात्र विद्यालयातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी परिक्षा अर्जाची फी मदत म्हणून देण्यात आली. दहिसर येथे मुख्य कार्यालय असलेल्या ओमसाई फाउंडेशन, वेल्फेअर ट्रस्ट आणि जय जनार्दन जैतापकर यांच्या आयोजनातून प्रत्येक विद्यार्थ्याला 370 रुपये देण्यात आले.
या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे 150 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. बरेचसे विद्यार्थी गोरेगाव आदवासीपाड्यात रहाणारे आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही शिक्षणाची ओढ असल्यानं ते या रात्रशाळेत येतात.
या विद्यार्थ्यांना मदत करताना संस्थेचे अध्यक्ष महेश बेळणेकर तसंच प्रमुख अतिथी म्हणून निशा गुप्ता उपस्थित होते. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून ही मुलं वंचित राहू नयेत आणि त्यांच्या यशस्वी भवितव्याचा मार्ग खुला व्हावा, हाच या मदतीमागचा उद्देश असल्याचं महेश बेळणेकर यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा