Advertisement

पावसाचा कहर, OYO ची भन्नाट ऑफर! दरात 60% पर्यंत कपात

मुंबईत मुसळधार पाऊस आणि पाणी साचण्याच्या काळात अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी OYO ने स्टे वर 60% सूट दिली आहे.

पावसाचा कहर, OYO ची भन्नाट ऑफर! दरात 60% पर्यंत कपात
(Representational Image)
SHARES

मुंबईकरांचा पावसाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी, OYO ने त्यांच्या हॉटेल्स आणि स्टे-रुम्सवर 60% पर्यंत सवलत आणली आहे. मुंबईकरांना (Mumbai Citizen)आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रे, खार, सांताक्रूझ, चर्चगेट-कुलाबा, BKC, पवई, ठाणे, पनवेल, ऐरोली आणि इतर शहरांमध्ये OYO ची सवलत उपलब्ध आहे.

अनेकदा मुसळधार पावसामुळे नागरिकांना घर गाठणं कठिण होतं. अशा परिस्थितीत राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या नातेवाईकांकडे आश्रय घेता येतो. पण OYO नं यावर उपाय काढत एक योजना आणली आहे.

या योजने अंतर्गत OYOच्या हॉटेल्स आणि स्टे रुम्सवर ६० टक्के सवलत मिळेल. ग्राहक आता OYO च्या अॅप किंवा वेबसाइटवर क्लिक करून आणि Mumbai Rain” कोड वापरून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

OYO चे प्रवक्ते SVP – उत्पादन आणि मुख्य सेवा अधिकारी, श्रीरंग गोडबोले, म्हणाले, “मुंबईत एक दशकापासून मी राहत आहे. पण आजही मला मुंबईची तुंबई झाली की घरं गाठणं कठिण होऊन जातं. पाणी साचल्यानं बराच वेळ ट्राफिकमध्ये जातो. तसंच ट्रेन्स बंद पडल्या की, स्टेशनवरच थांबायची वेळ येते. त्यामुळे आम्ही ही ऑफर आणली आहे.”

या पावसाळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी, OYO अॅप डाउनलोड करा, शेजारच्या परिसरात वैध सहभागी हॉटेल स्टे पर्याय शोधण्यासाठी ‘नजिकच्या’ चिन्हावर क्लिक करा, कूपन कोड ‘Mumbai Rain’ निवडा आणि आता बुक करा आणि पे करा.


● संपूर्ण जुलै महिन्यात जेव्हा शहरात जास्तीत जास्त पाऊस पडतो तेव्हा ग्राहक या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
● ग्राहक या कूपन कोडद्वारे वापरयोग्य 165 मालमत्तांमधून निवड करू शकतात; OYO टाउनहाऊसचा ज्यात समावेश आहे – कंपनीची प्रीमियम स्टे ऑफर देखील आहे.
● मुंबईकर किमान किमतीत वातानुकूलित आणि वाय-फाय असलेल्या खोल्या बुक करू शकतात.

● मुंबईत मुसळधार पाऊस आणि पाणी साचण्याच्या काळात अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी OYO ने स्टे वर 60% सूट दिली आहे.
● मुंबईकर ‘मुंबईरेन’ या कूपन कोडचा वापर करून सवलतीचा लाभ घेऊ शकतात.



हेही वाचा

यंदा गणेशोत्सवात मूर्तींच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा