Advertisement

'जन गण मन' च्या पिआनो व्हर्जनला ४ कोटी भारतीयांची पसंती

शयान इटालिया यानं पियानोवर 'जन गण मन' हे गाणं प्ले केलंय. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अधिक पसंत केला जातोय. हा व्हिडिओ केवळ ९ दिवसांमध्ये ४ कोटी १० लाख लोकांनी पाहिला अाहे.

'जन गण मन' च्या पिआनो व्हर्जनला ४ कोटी भारतीयांची पसंती
SHARES

भारताचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्याआधीच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत अाहेत. त्यापैकीच एक व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. शयान इटालिया याचा 'जण गण मन' हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे



शयान इटालिया यानं पियानोवर 'जन गण मन' हे भारताचं राष्ट्रगीत वाजवलं आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अधिक पसंत केला जातोय. हा व्हिडिओ केवळ ९ दिवसांमध्ये ४१ मिलियन म्हणजेच ४ कोटी १० लाख लोकांनी पाहिला अाहे. येत्या काही दिवसांत हा व्हिडिओ आणखी व्हायरल होईल यात काही शंका नाही.

 

येत्या दोन आठवड्यात शयानला संपूर्ण भारताला एकजूट करायचं आहे. यावर्षी भारत ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानुसार या व्हिडिओ देखील ७१ मिलियन म्हणजेच ७ करोड १० लाख लोकांनी पाहिला पाहिजे, असं आवाहन शयाननं केलं आहे. शयाननं #71 या हॅशटॅगअंतर्गत भारतीयांना एक चॅलेंज दिलं आहे. १५ ऑगस्टपर्यंत हा व्हिडिओ #71 देत शेअर करायचा आहे. जेणेकरून याला ७१ मिलियन व्ह्यूज मिळतील. शयानं म्हणाला की, मी माझी जबाबदारी पार पाडली आहे. आता भारताच्या नागरिकांनी एकत्र येत #71 हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे



शयान हा मूळचा हैद्राबादचा आहे. हैद्राबादहून तो मुंबईला स्थायिक झाला. शयान इटालिया हे संगीत क्षेत्रातील लोकप्रिय नाव असून तो गीतकार आणि पियानो वादक आहे. शयानने हा व्हिडिओ त्याची आई आणि देशाला समर्पित केला आहे. शयानच्या आईचं निधन कॅन्सरमुळे झालं होतं. त्यांनीच शयानला एक पियानो गिफ्ट दिला होता. कारण शयानला संगीत खूप प्रिय आहे.



हेही वाचा-

कॅफे चालवणारे 'स्पेशल १३'



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा