Advertisement

सासू -सासऱ्यांच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सासू सासरांच्या घरात राहण्याचा अधिकार सुनेला असल्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सासू -सासऱ्यांच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
SHARES

सासू सासरांच्या घरात राहण्याचा अधिकार सुनेला असल्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे.

तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या पीठाने म्हटलं होतं की, कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाही. मात्र, हा निर्णय आता  न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने बदलला आहे. तीन सदस्यीय खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणातील निर्णय बदलत ६-७ प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 

घरगुती हिंसा कायद्यानुसार पतीच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सासू सासरांच्या घरात राहण्याचा अधिकार सुनेला असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा या खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने सांगितलं की, पतीच्या वेगवेगळ्या मालमत्तेचे नाही तर सामायिक घरात मुलीचा देखील हक्क आहे.



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे  



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा