चेंबुर - आरसीएफ मैदानात 29 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत 25 राज्यांतून सुमारे 350 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतलाय. अखिल भारतीय आदिवासी कल्याण आश्रम संस्थेच्या वतीनं आदिवासी युवा खेळाडूंसाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. 'एकलव्य क्रीडा प्रकल्प' अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत नेपाळच्या खेळाडूंनाही प्रवेश दिलाय.
मुलांच्या आणि मुलींच्या गटात होणाऱ्या या स्पर्धेत लहान, मोठ्या अश्या दोन गटांमध्ये लढती होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना पदक देऊन गौरवण्यात येईल. 1988 सालानंतर पहिल्यांदाच मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यात येतेय.