Advertisement

सेंट्रल रेल्वेच्या महिलांचा डब्ल्यूसीजी रिंक हाॅकी स्पर्धेवर कब्जा


सेंट्रल रेल्वेच्या महिलांचा डब्ल्यूसीजी रिंक हाॅकी स्पर्धेवर कब्जा
SHARES

अापल्या अफाट अनुभवाच्या जोरावर अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात सेंट्रल रेल्वेच्या महिला संघाने सडन डेथ टायब्रेकरमध्ये फ्रेंड्स रेडचा ६-५ असा पराभव करत विलिंग्डन कॅथलिक जिमखाना अायोजित विक्टर डिमेलो स्मृती चषक रिंक हाॅकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एमएचएएलच्या मान्यतेने जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर रंगलेल्या या स्पर्धेत रकिया शेख हिने दोन वेळा गोल करत फ्रेंड्स रेडला अाघाडी मिळवून दिली होती. मात्र सेंट्रल रेल्वेने एस. रंजिता हिच्या गोलमुळे दोन्ही वेळेला ही पिछाडी भरून काढत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला.


टायब्रेकरमध्येही बरोबरी

टायब्रेकरमध्येही दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. सेंट्रलकडून रंजिता, कविता विद्यार्थी अाणि रेणुका यादव यांनी गोल केले. फ्रेंडस रेडकडूनही रकिया, माधवी पाटील अाणि मीनाक्षी यांनी गोल करत सामना ५-५ असा बरोबरीत सोडवला.


सडन-डेथमध्ये सेंट्रल रेल्वेची बाजी

सडन-डेथमध्ये माधवी हिने मारलेला फटका सेंट्रल रेल्वेच्या गोलकीपरने अडवला. त्यानंतर कविता विद्यार्थी हिने गोल करून सडन-डेथमध्ये सेंट्रल रेल्वेला विजय मिळवून दिला. विजेत्या संघाला १८ हजार तर उपविजेत्या संघाला १२ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले. रकिया शेख ही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.


हेही वाचा -

देविंदर वाल्मिकीच्या डबल गोलमुळे यूके युनायटेड उपांत्य फेरीत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा