मुंबई - मुंबई महानगरपालिका आर/दक्षिण विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन कांदीवलीच्या एमसीए मैदानात करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यात महापालिकेचे डॉक्टर आणि क्षयरोग पेशंट, महापालिका कर्मचारी आणि पोलीस यांनी सहभाग घेतला होता. क्षयरोग या आजारातून खचून न जाता आरोग्य निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी डॉक्टर आणि क्षयरोग पेशंट यांच्यामध्ये सामना आयोजित करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी आणि पालिका कर्मचारी यांच्यामध्ये देखील सामना पार पडला. या क्रिकेट सामन्याचे आयोजन महापलिकाच्यावतीने करण्यात आले होते. जर योग्यरित्या आजाराची काळजी घेतली तर आरोग्य निरोगी राहते त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे असे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.