चर्चगेट - दबंग मुंबईने दिल्ली वेवराइडर्सला 3-2 ने मात देत हॉकी इंडिया लीगच्या पाचव्या सत्रात सलग तिसऱ्यांदा विजय नोंदवला आहे.
अफ्फान युसूफने 29 व्या मिनटात केलेल्या मैदानी गोल आणि एक पेनल्टी कॉर्नरमुळे मुंबईला 3-0 ने आगेकूच करता आली. मात्र जस्टिन रीड रोज याने 43 व्या मिनिटाला आणि रुपिंदर पाल सिंह यांनी 54व्या मिनिटाला केलेल्या दोन पॅनल्टी कॉर्नरमुळे दिल्लीला पुनर्गामन करण्यात यश आलं, मात्र विजयाचे शिखर गाठता आले नाही.
या विजयानंतर मुंबई संघाने चार सामन्यात 17 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तीन सामन्यात चार गुणांसह दिल्लीचा संघ पाचव्या स्थानावर आहे.