Advertisement

दादर-विरार सायकल शर्यत २९ एप्रिलला रंगणार


दादर-विरार सायकल शर्यत २९ एप्रिलला रंगणार
SHARES

राईप मँगो स्पोर्टसतर्फे मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेच्या मान्यतेने दादर ते विरार या ७२ किलोमीटर अंतराच्या खुल्या सायकलिंग शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. एलिट पुरुष गटासाठी असलेली ही शर्यत रविवारी २९ एप्रिल रोजी होईल.


असा असेल स्पर्धेचा मार्ग...

दादर पूर्व नायगाव येथील लोकसेवा हायस्कूल येथून शर्यतीला सुरुवात होणार असून दादर टीटी, माटुंगा, सायन, प्रियदर्शनी सर्कल, चेंबूर, रमाबाई आंबेडकर नगर, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुलुंड, मुलुंड टोल नाका, ठाणे, मानपाडा, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, चेने क्रिक, फाऊंटन हॉटेल चौक, वसई खाडी पूल, ससूनपाडा, चंदनसार मार्ग विरार, विरार पश्चिम येथील व्हिवा महाविद्यालय असा या शर्यतीचा मार्ग असेल.


विजेता २१ हजारांचा मानकरी

या शर्यतीतील विजेत्याला २१ हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. दुसऱ्या स्थानावरील विजेत्याला रोख १८ हजार, तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १५ हजार, चतुर्थ विजेत्यास १० हजार आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास पाच हजार रुपये मिळतील. सहाव्या ते १० व्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन गौरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष अनिल तांबे (९८२१९३२३८७), शर्यतीचे संयोजक राजेंद्र कोयंडे (७७३८०४३४४१) यांच्याशी संपर्क साधावा.


हेही वाचा -

मुंबई-खंडाळा सायकल शर्यतीचा थरार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा