Advertisement

ममता प्रभूचे डॅशिंग ‘कमबॅक’!


ममता प्रभूचे डॅशिंग ‘कमबॅक’!
SHARES

भारताची माजी राष्ट्रीय खेळाडू ममता प्रभू हिने पाच वर्षांनंतर टेबल टेनिसच्या मैदानात उतरून पुन्हा एकदा तिच्या चमकदार खेळीचे प्रदर्शन सर्वांना दाखावले. ऑल मुंबई फोर स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेतल्या महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत तिने विजय मिळवला.

या स्पर्धेमुळे ममता ही अव्वल मानांकित स्थानावर असून राज्यातील आघाडीची दिव्या देशपांडे महाजन ही चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

पहिल्या सामन्यात तिने मानंकित श्वेता पार्टे हिचा पराभव करून शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात चौथ्या मानांकित आश्लेषा त्रेहान हिला नमवत विजय मिळवला. ही स्पर्धा जुहू विलेपार्ले जिमखान्यातर्फे आयोजित करण्यात आली होती.

ममताने श्वेताबरोबर झालेल्या सामन्यात आक्रमक असा खेळ करत 11-6,11-7, 10-12, 11-6, 11-3 असा विजय मिळवला. चौथ्या मानंकीत असलेल्या आश्लेषाला उप-उपांत्य फेरीत 7-11, 11-7, 11-13, 12-10, 11-5, 15-13 असे पराभूत करत विजय मिळवला.

यादरम्यान झालेल्या इतर सामन्यात सब ज्युनिअर गटात मानव मेहताने तिसऱ्या मानांकित असलेल्या जिग्नेश राहतवालला 4-2 अशा फरकाने नमवत तरुण मुलांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सब ज्युनिअर मुलांच्या एकेरी गटात 12 वर्षांच्या जश मोदीने ऋषीकेश मल्होत्रावर 13-11, 11-8, 8-11, 11-8 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.



हेही वाचा -

टेबल टेनिस स्पर्धेत मुलुंड जिमखान्याच्या मुलींची बाजी


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा