मढ - मालाड पश्चिमेकडील मढ मार्वे रोड, आश्रम डोंगरपाडा येथे काळबादेवी क्रिकेट संघाच्या वतीनं दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट सामन्यात जोगेश्वरीच्या साई 11 या टीमनं विजेतेपद पटकावलं. तर वसईच्या यंग स्टारने उपविजेतेपद पटकावलं. रवी विश्वकर्माला उत्तम फलंदाज म्हणून गौरवण्यात आलं. शनिवार आणि रविवारी दिवस-रात्र रंगलेल्या या क्रिकेट सामान्यांचं आयोजन प्रमोद गाडगे यांनी केलं होतं. या स्पर्धेत मुंबईतून एकूण 20 संघांनी सहभाग घेतला.