सातव्या वसई-विरार राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून 10 डिसेंबर 2017 ला ही मॅरेथॉन आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी 24 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. वसई-विरार मॅरेथॉनमध्ये भारतीय अॅथलेटसाठी एकूण 35 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
वसई-विरार मॅरेथॉनमध्ये मुंबई, ठाणे या शेजारील शहरातील अॅथलेटदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. राष्ट्रीय पातळीवर याची नोंद केली जाते. य़ा मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही www.ibvvmm.com या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
हेही वाचा -
शंभर नंबरी मॅरेथॉनपटू, १०० दिवसांत धावला १० हजार किमी