Advertisement

हॉटेल, बाथरूम, चेंजिंग रुममधील छुपा कॅमेरे शोधण्यासाठी ९ जबरदस्त ट्रिक्स

आज आम्ही तुम्हाला हॉटेल्समधलेच नाही तर चेंजिंग रुममधले लपवलेले कॅमेरे कसे ओळखाल याबद्दलच सांगणार आहोत. जेणे करून तुम्ही पुढच्यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर खबरदारी म्हणून या ट्रिक्सच्या मदतीनं सर्व तपासून घ्याल.

हॉटेल, बाथरूम, चेंजिंग रुममधील छुपा कॅमेरे शोधण्यासाठी ९ जबरदस्त ट्रिक्स
SHARES

पुण्याच्या एका हॉटेलमध्ये स्त्रियांच्या शौचालयात कॅमेरा आढळल्यानं एकच खळबळ उडाली. सर्वात महत्त्चाचं म्हणजे ही घटना एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली. त्यामुळे हॉटेल नावाजलेलं असो वा नसो पण आपण काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपलं रक्षण आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे आपणच अधिक सतर्क राहिलो तर अशा घटना वेळीच रोखून योग्य ती कारवाई करता येते. आज आम्ही तुम्हाला हॉटेल्समधीलच नाही तर चेंजिंग रुममधले लपवलेले कॅमेरे कसे ओळखायचे याबद्दलच सांगणार आहोत. यामुळे तुम्ही पुढच्यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर खबरदारी म्हणून या ट्रिक्सच्या मदतीनं सर्व तपासून घ्याल


) हॉटेल रुममधल्या सर्व लाईट बंद करा. टीव्ही किंवा इतर छोटी-मोठी उपकरणं ज्यातून प्रकाश येतो अशा सर्व गोष्टी बंद करा. रुममध्ये पूर्ण अंधार आवश्यक आहे.

) यानंतर मोबाईलचा कॅमेरा वापरा. फक्त एक काळजी घ्या की तुमच्या मोबाईलची फ्लॅश लाईट बंद असावी. आता तुम्हाला शंका आहे त्या ठिकाणी मोबाईलच्या कॅमेऱ्यातून पाहा.

3) पांढऱ्या रंगातील लहान ठिपके दिसतायेत का हे नीट निरखून पाहा. हे ठिपके तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही. पण कॅमेऱ्यात ते टिपले जातात.

) मोबाईलमध्ये डिटेक्ट हिडन कॅमेरा किंवा बॉडिगार्ड असे अॅप डाऊनलोड करू शकता. यापैकी कुठलाही अॅप ओपन करून मोबाईल पूर्ण रुममध्ये फिरवा. जर मोबाईल स्क्रिनवर रेड कलरचा लाइट ब्लिंक झाली तर समजून जा की रुममध्ये कॅमेरा आहे

) ज्या ठिकाणी तुम्हाला कॅमेरा लपवल्याचा संशय आहे त्या ठिकाणाहून एखादा फोन कॉल करा. जर सिग्नलचा काही प्रॉब्लेम असेल तर तुमचा संशय बरोबर आहे. कारण मोबाइलच्या सिग्नलमध्ये कॅमेरात वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिक वायर्सचा अडथळा येतो. त्यामुळे फोन लागत नाही किंवा नीट नेटवर्क येत नाही. 

६) अनेक वेळा रुममधील मिररमध्ये टू वे मिरर सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. टू वे मिररच्या मदतीनं आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. पण आरशाच्या पलिकडच्या रुममधील व्यक्तीला स्पष्टपणे आपण काय करतोय ते दिसत असतं. यासाठी आरशाला एका बोटानं स्पर्श करा आणि बोटाच्या आणि त्याच्या प्रतिबिंबात अंतर असेल तर आरसा ओरिजनल आहे जर अंतर नसेल तर तो टू वे मिरर आहे असं समजावं.

७) कधी कधी रुमच्या बाथरूममध्ये देखील छुपा कॅमेरा ठेवलेला असतो. शॉवर, नळांवरील खिळ्यांमध्ये अशा काही वस्तूंमध्ये कॅमेरा लपवलेला असू शकतो. त्यामुळे आंघोळीला जाण्याआधी सर्व नीट तपासून पाहावं. यासाठी गरम-गरम पाणी एखाद्या भांड्यानं शॉवरवर, नळांच्या जवळील खिळ्यांवर मारावं. जर आत कॅमेरा असेल तर धूर येईल. आरसा असेल तर वर सांगितल्याप्रमाणे बोटाने तपासून पाहावं.

८) रुममधल्या छोट्या-मोठ्या वस्तू देखील तपासून पाहा. कुठल्या वस्तूमागे कॅमेरा लपवला नाही ना. फ्लॉवरपॉट, फोटो फ्रेम्स, स्मोक डिटेक्टर किंवा पेंटिंग फ्रेम्स हे तपासा. 

९) टीव्ही जर पाहत नसाल तर त्यावर एखादा कपडा टाकून ठेवा. कारण आजकल स्मार्ट टीव्हीमध्ये असलेल्या कॅमेरातून देखील तुमच्या खाजगी क्षणांची चित्रफीत बनवली जाऊ शकते.



हेही वाचा

‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका

आता फेसबुकवरूनही करा पेमेंट


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा